
आता हा कागद असेल तरच मिळणार पेट्रोल/डीझेल, सरकारनं घेतला मोठा निर्णय.
इंधन भरायला गेल्यावरचं नवं सरप्राइझ! सरकारनं घेतला मोठा निर्णय, आता इंधन मिळवणं होणार कठीण…
पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर गेलात आणि अचानक तुमच्याकडे काही कागदपत्रांची विचारणा झाली, तर चकित होऊ नका. कारण, महाराष्ट्र सरकारनं वाहनधारकांसाठी एक नवं आणि कठोर धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या नियमानुसार, काही ठराविक कागदपत्रांशिवाय तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल मिळणारच नाही. हो, अगदी बरोबर वाचलं! आता इंधन भरताना एक विशिष्ट सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं झालं आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला तुमच्या गाडीसाठी एक थेंबही इंधन दिलं जाणार नाही.
काय आहे हे नवं सर्टिफिकेट?
राज्यात दररोज हजारो नव्या गाड्या रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढतोय, आणि त्याचबरोबर वायू प्रदूषणाची पातळीही दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. हाच विचार करून, सरकारने आता इंधन देताना ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ (PUC Certificate) सक्तीचं केलं आहे.
PUC सर्टिफिकेट हे कोणत्याही वाहनासाठी आधीपासूनच अनिवार्य आहे, मात्र अनेक चालक त्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
‘नो पीयूसी, नो इंधन’ – सरकारचं स्पष्ट धोरण
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, राज्यभरात आता ‘नो पीयूसी, नो इंधन’ धोरण लागू केलं जाणार आहे. यानुसार, प्रत्येक वाहनचालकाला पेट्रोलपंपावर इंधन भरण्याआधी वैध पीयूसी सर्टिफिकेट दाखवावं लागणार आहे. सर्टिफिकेट नसेल, तर इंधन नाकारलं जाईल.
हे धोरण इतकं गरजेचं का?
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरांत दुचाकी आणि चारचाकींची प्रचंड संख्या आहे. यामुळे वायू प्रदूषणात झपाट्यानं वाढ झाली आहे. काही जुन्या वाहनांमधून अजूनही मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो, जो थेट आपल्या श्वासात जातो.
याआधी PUC प्रमाणपत्राची आवश्यकता असली तरी त्याची अंमलबजावणी फारशी प्रभावी नव्हती. अनेक जण हे सर्टिफिकेट काढतच नाहीत, तर काही बनावट सर्टिफिकेटही वापरतात. यामुळे कायदा असूनही पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत फारसा फरक पडत नव्हता.
आता मात्र सरकारने कडक पावलं उचलत, सरळ इंधनावरच अट टाकली आहे. म्हणजे, नियम तोडल्यास ना दंड, ना समज – थेट इंधन रोख!
तर लक्षात ठेवा, पुढच्या वेळी पेट्रोलपंपावर जाण्यापूर्वी तुमचं PUC प्रमाणपत्र सोबत आहे ना, याची खात्री करा… कारण आता इंधन मिळणं सोपं नाही!