जुलै महिन्यात शिर्डीत ही घटना घडली आहे. त्यानंतर तरूणीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यातून सावरल्यानंतर तिचे आपल्यावर ओढावलेल्या या प्रसंगाची माहिती दिली. त्यामुळे अनाथालयाच्या मदतीने नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील एका अनाथालयात ही तरुणी राहते. जुलै महिन्यात रागाच्या भरात ती अनाथालयातून. १४ जुलै २०२२ रोजी निघून गेली. ती शिर्डीत मंदिराच्या परिसरात एकटीच राहत होती. दिवाळीच्या आधी काही दिवस आधी रात्रीच्यावेळी काही तरुण तिच्याजवळ आले. तुला पोटभर जेवण देतो, असे सांगून ते तिला घेऊन गेले. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला.
यानंतर या तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे तसेच ती गरोदर असल्याचेही यावेळी लक्षात आले. शुद्धीवर आल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी या तरुणीने नगरच्या एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने दिवाळीच्या आधीच घटना कथन केली असली तरी त्यापूर्वीही तिच्यावर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता आहे. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने तिच्याकडून माहिती काढण्याचेही मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने शिर्डीला जाऊन घटनेची अधिक माहिती घेतली, पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.