जाधव यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने हे दोघं पती-पत्नी आकडी तिथेच ठेवून घराकडे परत निघाले होते. त्याचवेळी समोरून संभाजी घाडगे आला. त्याच्या हातात नारळ सोलण्याचं हात यंत्र होतं. त्याने राजाराम घाडगे यांना ‘तू दोन वर्षांपूर्वी मला मारलं होतं, वडिलोपार्जित जमिनीवरून न्यायालयात खटला खेळत होतास, आता तुला जिवंत सोडणार नाही’ असं म्हणत हातातील यंत्र राजाराम यांच्या डोक्यात मारलं. यंत्र डोक्यात मारल्यानंतर राजाराम जमिनीवर कोसळले. यानंतर संभाजीने दगड उचलून त्यांच्या पाठीत मारला.
बाप लग्न करुन देईना, संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापाचा काटा काढला
सुरेखा या राजाराम यांना वाचवण्यासाठी मध्ये पडल्या. त्यामुळे संभाजी तेथून निघून गेला. हा संपूर्ण प्रकार पाहून ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. काही जणांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून राजाराम घाडगे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेखा घाडगे यांच्या तक्रारीवरून संभाजी घाडगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संभाजी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोन भावंडांमध्ये झालेल्या वादाचा शेवट भयंकर झाला. या घटनेची परिसरात मोठी चर्चा असून पोलीस पुढील तपास करत आहेत.