सोसायटीत राहणाऱ्या एका परिवाराने त्यांच्या घरात एक नोकर ठेवला होता. तो मुळचा नेपाळमधला होता. एक आठवड्यापूर्वी त्याचा मित्रही आला होता. तोसुद्धा त्याच्यासोबत त्याच घरात राहत होता. रविवारी दोन्ही नोकरांनी संपूर्ण परिवाराला सूप पिण्यासाठी दिलं. मात्र त्यात नशेची गोळी टाकण्यात आली होती. ते सूप पिताच संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झाले. त्यानंतर दोन्ही नोकरांनी घरातील तिजोरीतील पैसे- दागिने घेऊन तिथून पळ काढला.
वाचाः पतीचा खून केला, मृतदेह घरातच टॉवेलमध्ये गुंडाळला; घराला कुलूप लावून पत्नीने ठोकली धूम
या दरम्यान, सोसायटीमधील नागरिकांना संशय आल्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने दोन्ही नोकरांनी लिफ्टमध्ये पडकले. सोसायटीतील लोकांच्या तत्परतेमुळं या कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान टळले. रहिवाशांनी तातडीने पोलिसांना याबाबत सूचना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चोरीचा पूर्ण माल ताब्यात घेतला आहे. मात्र, या सगळ्या गोंधळात एक चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
वाचाः देशद्रोहाबाबत घूमजाव; ‘पीएफआय’वर इतर कलमांच्या आधारे गुन्हा दाखल
नोएडा एसीपी-१ रजनीश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीबाबात माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचला. एका चोराला अटक करण्यात आली आहे. व चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून दुसऱ्या चोराचा शोध घेण्यात येत आहे. तर, पीडीत कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाचाः सोने तस्करीचे केंद्र मुंबईत; समुद्रामार्गे तस्करीच्या घटना वाढल्या