ज्या ब्रिटनने आपल्यावर २०० वर्षे राज्य केले, मंदीच्या काळात त्याच ब्रिटनला मागे टाकून भारत आजघडीला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे. सद्यस्थितीत अमेरिका, रशिया हे देश महागाईचा सामना करत आहेत. मात्र, भारत महागाई आटोक्यात आणून अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया रचत आहे. आजघडीला भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश झाला आहे. २०१४ पर्यंत भारतामध्ये ५२ टक्के मोबाईल फोन बाहेर यायचे. मात्र, आज ९७ टक्के मोबाईल फोनची निर्मिती देशात होत आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था कोलमडत असताना मोदीजींमुळे आपली अर्थव्यवस्था मजबूतपणे पुढे वाटचाल करत आहे, असे जे.पी. नड्डा यांनी म्हटले.
टीबी आणि पोलिओच्या लसी येण्यासाठी अनेक वर्षे गेली, पण मोदींच्या काळात कोरोनाची लस ९ महिन्यांत आली: नड्डा
अमेरिकेत अजूनही लसीकरण पूर्ण झालेले नाही. मात्र, भारतात २२० कोटी लसीचे डोस दिले गेले. काँग्रेसचे नेते अशिक्षित आहेत. त्यांच्यामुळे देशात टीबी आणि पोलिओसारख्या आजारांच्या लसी येण्यासाठी अनेक वर्षे गेली. मात्र, कोरोनाची साथ पसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टास्क फोर्स स्थापन करून अवघ्या ९ महिन्यात कोरोनाच्या दोन लसी आणल्या. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील अतिगरिबी एका टक्क्यापेक्षाही कमी झाली. गरीब कल्याण योजनेतंर्गत वाटप करण्यात येणाऱ्या मोफत धान्यामुळे हे शक्य झाले. या सगळ्यामुळे भारताकडे जगातील इतर देश वेगळ्यादृष्टीने पाहू लागले आहेत, असे जे.पी. नड्डा यांनी सांगितले.