गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये मर्यादित क्षमतेत ही चाचणी सुर करण्यात आली आहे. सेरोलॉजिकल विश्लेषण आणि डीएनए विश्लेषण यांसारख्या पारंपारिक पद्धतींना लॅम्प डीएनए चाचणी हा चांगला पर्याय आहे. वरील दोन्ही चाचणीत एक दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागत होता. मात्र, लॅम्प डीएनए चाचणीसाठी एका तासांचा कालावधी लागणार आहे.
निंकुज ब्रह्मभट्ट हे एनएफएसयूचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. ब्रह्मभट्ट यांच्या शोधप्रबंधात त्यांनी Development of Loop-mediated Isothermal Amplification (LAMP) यावर सखोल संशोधन केलं आहे. प्राण्यांची अंतर-प्रजाती फॉरेन्सिक तपासणी’ करण्यासाठी लॅम्पचा वापर केला जातो. २०२०मध्ये त्यांनी प्राध्यापक विवेक उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शोधप्रबंध पूर्ण केला आहे. दरम्यान, ही पद्धत वापरणारे गुजरात हे पहिलेच राज्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः मुंबई एक्स्प्रेसवेवर थरार; भरधाव कंटेनरचा अचानक ब्रेक फेल, पण चालकाने डोकं चालवलं अन् टळली दुर्घटना
यापूर्वी गोमांसाची चाचणी करताना गोळा केलेले नुमने बराच काळ उष्णतेच्या संपर्कात राहिले किंवा जप्तीच्या दीर्घ कालावधीनंतर त्याचे विश्लेषण केले गेले तर त्याचा अहवालावर परिणाम होतो, असं ब्रह्मभट्ट यांनी म्हटलं आहे. LAMP DNA पद्धतीचा वापर करून, प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीच्या इतर पद्धतींप्रमाणे नमुन्याचे जागेवरच विश्लेषण केले जाऊ शकते. ही चाचणी अगदी लहान किंवा शिजवलेल्या मांसाच्या नमुन्यांमधूनही गोमांस ओळखू शकते. कधीकधी जप्त केलेल्या नमुन्यांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकार असू शकतात, असंही ते म्हणाले.
वाचाः घराला रंग देताना मुलगा थरथरत होता, वडिलांनी शिडीला हात लावताच घडला मोठा अनर्थ
वादग्रस्त प्रकरणांमध्ये सेरोलॉजिकल पद्धती योग्य निकाल देत नाही. अशा प्रकरणांमध्ये LAMP DNA पद्धती वापरल्या जातात. या पद्धतींना प्रमाणबद्ध साच्यात बांधणं गरजेचे आहे जेणेकरून त्याचा इतर क्षेत्रातही मोठ्याप्रमाणात वापर होईल, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
<p style="text-align: justify;"><strong>Madhya Pradesh News Today:</strong> भारत सहित पूरी दुनिया ने 3 साल वैश्विक महामारी…
Hina Khan’s birthday is on October 2. (Photo Credits: Instagram)From a stunning view of her…
Food and grocery delivery major Swiggy has received markets regulator Sebi’s clearance to launch its…
NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Wednesday lauded the efforts of each and every…
Waqf Amendment Bill Email: वक्फ संशोधन बिल पर संयुक्त संसदीय समिति (जेपीसी) को सुझाव के लिए…
Meloni And Musk Viral Photos : दुनिया के सबसे अमीर शख्स एलन मस्क ज्यादातर किसी…