कोकणात महिलांच्या शिष्यवृत्तीसाठी, त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करणं हाच उद्देश ठेवून चिपळूणमधील स्मृती राणे यांनी आजवर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. जिजाऊ राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जातं. यातूनच त्यांनी कोकणातली पहिल्या लाइव्ह किचनचा कन्सेप्ट असलेली बेकरी सुरू केली आहे.
गेले चार ते पाच वर्ष स्मृती राहणे महिलांसाठी काम करत आहेत. तीन ते चार वर्षांपूर्वी या संस्थेची सुरुवात करण्यात आली. महिला सशक्तिकरण करणं हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
यापैकीच एक म्हणजे ही लाइव्ह बेकरी…’Bread o clok’ नावाप्रमाणेचं युनिक आणि भन्नाट संकल्पना असलेली ही बेकरी आहे. तुम्ही जर या बेकरीत गेलात तर तुम्हाला हव्या असणाऱ्या पदार्थांसोबतच ते कसे बनतात हेही लाइव्ह पाहायला मिळतं. लाइव्ह किचन ही या बेकरीचा पहिली आणि महत्त्वाची संकल्पना. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपण जे खातोय ते कसं बनवलं जातं, किती स्वच्छता बाळगून बनवलं जातं हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहता येतं.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये महिलांनी महिलांसाठी उभारलेली ही पहिलीच बेकरी असावी. येथे स्वच्छता, टापटीपपणा तर आहेच शिवाय इथले सगळे पदार्थ अत्याधुनिक मशीनद्वारे तयार केले जातात. ऑइल फ्री अन् केमिकल फ्री असणारे पदार्थ हे या बेकरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे सामान्यपणे बेकरीत जे पदार्थ मिळत नाहीत असे खास इटालियन फूड, बिस्कीट, केक हेही या बेकरीत बनवले जात आहेत. एवढचं नाही तर आता हे बेकरी प्रोडक्टस् लोकल मार्केटमध्ये होलसेल आणि रिटेलमध्ये पदार्थांचा पुरवठा केला जाणार आहे.
खास करून महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने उभारलेल्या या बेकरीच्या माध्यमातून दहा ते पंधरा महिलांना रोजगार मिळाला आहे. ही संख्या लवकरच वाढत जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. आणि त्यानुसार महिलांना योग्य ते ट्रेनिंगही देण्यात येत आहे.
बेकरीचं वैशिष्ट्य पाहून या डिजीटल बेकरीमुळे ग्राहक तर खूश आहेतच पण सोबतच ही बेकरी म्हणजे महिलांना त्यांच्या पायवर उभं करणारं एक खंबीर असं व्यासपीठच आहे.
<p style="text-align: justify;"><strong>Madhya Pradesh News Today:</strong> भारत सहित पूरी दुनिया ने 3 साल वैश्विक महामारी…
Hina Khan’s birthday is on October 2. (Photo Credits: Instagram)From a stunning view of her…
Food and grocery delivery major Swiggy has received markets regulator Sebi’s clearance to launch its…
NEW DELHI: Prime Minister Narendra Modi on Wednesday lauded the efforts of each and every…
Waqf Amendment Bill Email: वक्फ संशोधन बिल पर संयुक्त संसदीय समिति (जेपीसी) को सुझाव के लिए…
Meloni And Musk Viral Photos : दुनिया के सबसे अमीर शख्स एलन मस्क ज्यादातर किसी…